Ad will apear here
Next
महिला शेतकरी भरवणार दर बुधवारी आठवडी बाजार
पटवर्धन बाग परिसरात अभिनव उपक्रम
पटवर्धन बाग परिसरातील महिला शेतकऱ्यांनी भरवलेल्या आठवडी बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी महिला शेतकऱ्यांसह नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, जयंत भावे, संदीप खर्डेकर आदी

पुणे : थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना भाजीपाला मिळावा या उद्देशाने शहरातील विविध प्रभागांमध्ये आठवडी बाजारांचे आयोजन करण्यात येते. येथील पटवर्धन बाग परिसरातही आठवडी बाजार सुरू झाला आहे; मात्र हा बाजार थोडा वेगळा आहे. कारण हा बाजार सगळ्या महिला शेतकऱ्यांनी आयोजित केला आहे. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने अंबाबाई सेंद्रिय शेतकरी बचत गट आणि आदर्श शेतकरी महिला बचत गटाच्या सदस्यांनी हा आठवडी बाजार सुरू केला आहे. बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी या आठवडी बाजाराचा शुभारंभ झाला. येथील साकेत सोसायटीशेजारी दर बुधवारी दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत हा बाजार भरणार आहे. 

नुकतेच याचे उद्घाटन क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, महिला बचत गटाचे प्रवर्तक योगेश देशमुख, जनार्दन क्षीरसागर, सुवर्णा काकडे, वंदना दाभाडे, राजश्री आव्हाड यांच्या उपस्थितीत झाले. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

‘आम्ही येथे सेंद्रिय व गावरान भाज्या विक्रीसाठी ठेवणार असून, त्यात रानभाज्या, फळं, कडधान्य, मसाले व दुग्धजन्य पदार्थही उपलब्ध असतील,’ असे आदर्श शेतकरी महिला बचत गटाच्या प्रमुख वंदना दाभाडे व राजश्री आव्हाड म्हणाल्या.

 
‘महिला आपल्या कुटुंबाची योग्य काळजी वाहतात आणि घरातील ज्येष्ठांना आणि मुलांना सकस आहार मिळावा याकडे त्यांचा कल असतो म्हणूनच मी महिला शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाल्याचा आठवडे बाजार सुरू करण्यावर भर दिला आणि आज माझ्या प्रभागात या अंबाबाई सेंद्रिय शेतकरी बचत गटाच्या आगळ्यावेगळ्या आठवडे बाजाराचे उद्घाटन करताना मला मनस्वी आनंद होत आहे,’ असे मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.

‘महिलांनी रास्त दरात ताज्या भाज्या विकल्या तर या भागातील चोखंदळ नागरिक निश्चितच त्याला प्रतिसाद देतील आणि हा प्रयोग यशस्वी होईल’, असे वारजे कर्वेनगर प्रभाग समितीचे अध्यक्ष जयंत भावे म्हणाले.

कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले. सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी, तर योगेश देशमुख यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZTMCE
 Good idea. But why only Pune?
 A very good initiative by Manjushree tai, it will be definitely a win win situation for salers as well as buyers,
Congratulations and All the best
 Thanks Manjushree Tai for your initiative. It's a big help for this women's group and also for people like us in this area. Manjushree Tai and Sandeepji aage badho
 Nice
Similar Posts
ग्राहकांना रास्त नि शेतकऱ्यांना जास्त भाव देणारे सेंद्रिय भाजीपाल्याचे ‘डॉ. खर्डे मॉडेल’ पुणे/पिंपरी : शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके यांचा अनिर्बंध वापर केल्यामुळे त्यांचे अंश शेतीमालात उतरतात. अशी कृषी उत्पादने मानवी आरोग्याला घातक असल्याने सेंद्रिय उत्पादने आहारात असण्याची गरज आहे; मात्र सेंद्रिय उत्पादनांचे दर जास्त असल्याने मध्यमवर्गीयांना ती परवडत नाहीत. शिवाय, त्यांची विक्री किंमत
गिरिजाशंकर सोसायटीतर्फे गरजूंना सायकली भेट पुणे : कोथरूड भागातील गिरिजाशंकर सोसायटीतील रहिवाशांनी आपल्याकडील वापरात नसलेल्या सायकली गरजू मुलांना देण्याचा अभिनव उपक्रम राबवला आहे. सायकल-रिसायकल संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून, सोसायटीने १७ सायकली संस्थेकडे दिल्या आहेत.
भीमथडी जत्रा २२ ते २६ डिसेंबरदरम्यान पुणे : महाराष्ट्राच्या संस्कृतीत जत्रा म्हणजे आनंदाचा,उत्साहाचा,खरेदीचा,भेटीगाठीचा,सांस्कृतिक आदान-प्रदानतेचा एक सोहळा असतो. भीमथडी जत्रेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा दुवा ठरणारा संवाद सोहळा दर वर्षी पुण्यात रंगतो. यंदा हा सोहळा २२ ते २६ डिसेंबर दरम्यान कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर, सिंचननगर येथे होणार आहे
महिला बचत गटांसाठी ‘घरोबार’चे व्यासपीठ पुणे : ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे, बचत गटांतील महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात ‘फिक्की फ्लो’ संस्थेच्या वतीने ‘घरोबार डॉट कॉम’चे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language